महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता 6 महिन्याची गर्भवती - अकोला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय आरोपीला डाबकी रोड पोलिसांनी आज अटक केली.

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता 6 महिन्याची गर्भवती

By

Published : Jun 18, 2019, 4:23 PM IST

अकोला - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय आरोपीला डाबकी रोड पोलिसांनी आज अटक केली. ही पीडित मुलगी 6 महिन्यांची गर्भवती होती. हरिश्चंद्र गजानन पवार, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता 6 महिन्याची गर्भवती

नवीन सुकोडा येथे राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर आरोपीने अत्याचार केला होता. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी 6 महिन्यांची गर्भवती होती. हा सर्व प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. त्यानुसार आईने डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details