अकोला- बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनाचे टायर चोरल्याप्रकरणी एकास उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. अशोक गोपीनीथ काळे, असे त्याचे नाव असून त्याने इतर जिल्ह्यातही चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
बाळापूर पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून चोरट्यास केली अटक - अकोला जिल्हा बातमी
बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनाचे टायर चोरल्या प्रकरणी एकास उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अमोल हरिभाऊ फाळके यांच्या गाडीचे सहा टायर, डिक्ससह दीड लाख रुपयांचे साहित्य चोरी गेले होते. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा येथील अशोक गोपीनाथ काळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेने त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने इतर सहकऱ्यांंसोबत चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे.
हेही वाचा -शर्जील यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; रामनवमी शोभायात्रा समितीची मागणी