लहानग्यांसोबत अधिकाऱ्यांनीही घेतले गणपती बनवण्याचे प्रशिक्षण
अकोला येथे अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही गणपती बनवण्यात सहभाग घेतला.
लहानग्यांसोबत अधिकाऱ्यांनीही घेतले गणपती बनवण्याचे प्रशिक्षण
अकोला - अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही गणपती बनवण्यात सहभाग घेतला.
यावेळी पालकमंत्री डॉ.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षक शरद कोकाटे यांनी विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनाही गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शाडू मातीचा गणपती बनवला. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर अणि त्यांची पत्नी भूमिका गावकर यांनीही या कार्यशाळेला भेट दिली. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.