अकोला -ओबीसी प्रवर्गाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचातीसह राज्यातील पाच जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील पदे रिक्त झाली आहेत. आता या पदांवर ओबीसींच्या ऐवजी खुल्या गटातील नागरिकांची निवडणूक होत आहे. ओबीसी आरक्षणाच्या व्यतिरिक्त इतर प्रवर्गातून होणारी ही निवडणूकीची खेळी ही अतिशय वाट लावणारी असल्याचा आरोप जिल्हा ओबीसी समन्वयक प्रा. संतोष हुसे यांनी केला आहे.
हेही वाचा -धक्कादायक! मादी श्वानावर लैंगिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल
राज्यातील पाच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. या निकालानुसार ओबीसी प्रवर्गातील सर्व पदे या पाच जिल्ह्यातील रद्द करण्यात आली आहेत. या निकालामुळे ओबीसी आरक्षण रद्द केल्याचा आरोप ओबीसी संघटनांकडून करण्यात आला आहे. आता या रिक्त ओबीसी पदां खुल्या गटातील आरक्षणानुसार निवडणूक घेण्यात येत आहे. यावरून ओबीसी प्रवर्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द झाल्याचा स्पष्ट पुरावा असल्याचे ओबीसी संघटनांचे म्हणणे आहे.