महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला : हट्टापायी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रकार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अकोला बातमी

राज्यभरातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असून स्वतःच्या हट्टापायी कुलगुरु आणि इतर संबंधितांनी परीक्षा घेत विद्यार्थ्यांना यामध्ये गोवण्याचा हा प्रकार केला आहे, असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांची प्रतिक्रिया

By

Published : Oct 20, 2020, 7:32 PM IST

अकोला - विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. परंतु, या परीक्षा घेताना कुलगुरु व इतर संबंधितांनी परीक्षा घेण्याचा आपला हट्ट पूर्ण केला आहे. याचा त्रास मात्र विद्यार्थ्यांना होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी आज (मंगळवार) केला.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवड करण्यासाठी गव्हाणे अकोल्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठांकडे परीक्षा घेण्यासंदर्भात तांत्रिकदृष्ट्या कुठलेही मनुष्यबळ नाही. असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गेल्या आठ दिवसांपासून यासंदर्भात कुलगुरु राज्यपालांशी पत्रव्यवहार करण्यात आला व त्यांना या परीक्षा घेऊ नये, अशी विनंती करण्यात आली. तरीही विद्यापीठाने या परीक्षा घेतल्या. मात्र, या परीक्षा घेताना तांत्रिक दृष्ट्या त्या घेण्यात आलेल्या नाहीत. ऑफलाईन किंवा ऑनलाइन घेतल्या तरीही त्या विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत. स्वतःच्या हट्टापायी कुलगुरु आणि इतर संबंधितांनी परीक्षा घेत विद्यार्थ्यांना यामध्ये गोवण्याचा हा प्रकार केला आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांची प्रतिक्रिया

यासंदर्भात राज्यपाल व विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंना आम्ही पत्र दिलेले आहे. आम्ही त्यांना चार दिवसांचा वेळ दिलेला आहे. त्यानंतरही त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही राजभवनावर आंदोलन करू, असा इशाराही सुनील गव्हाणे यांनी दिला आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, युवक जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, शहराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, अविनाश चव्हाण हे उपस्थित होते.

हेही वाचा -अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details