अकोला - लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत १६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ४ उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये नामंजूर करण्यात आले आहेत.
अकोल्यात नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये ४ उमेदवारांचे अर्ज नामंजूर - नामनिर्देशन पत्र
अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत १६ उमेदवारांपैकी ४ जणांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनमध्ये अकोला लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. ही छाननी निवडणूक निरीक्षक विनोदसिंग गुजियाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार बीजवल यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नामनिर्देशन छाननीमध्ये प्रल्हाद अश्रूजी देबाजे, भानुदास संपतराव वानखडे, संदीप बाबुराव हिवराळे आणि गजानन शांताराम तायडे यांचे नाम निर्देशन पत्र नामंजूर करण्यात आले आहे. बहुजन समाज पार्टीचे बी. सी. कांबळे, भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे अरुण कंकर वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रविण लक्ष्मण भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष देवानंद इंगळे, अपक्ष प्रविण पुरिया, अपक्ष मुरलीधर पवार, अपक्ष सचिन शर्मा, असे एकूण १२ उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहे. अकोला लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ मार्च आहे.