अकोला -बाळापूर तालुक्यातील गोरेगाव, वाडेगाव यासह आदी परिसरातील मोबाईल नेटवर्क बंद पडले आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून गावात मोबाईल फक्त शोभेची वस्तू झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना ऑनलाइन अभ्यास करता येत नाही आहे. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी आज थेट पालकांना सोबत घेऊन बीएसएनएल कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला.
कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू झाले झाले. तर ग्रामीण भागामध्ये मोबाईल नेटवर्क ही मोठी अडचण आहे. ही अडचण अद्यापही दूर झालेली नाही नाही. अशी परिस्थिती असताना बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, गोरेगाव यासह जवळपासच्या गावांमध्ये बीएसएनएल किंवा इतर कंपनीचे नेटवर्क मिळत नाही आहे. ही परिस्थिती गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कुठलाच कुठलाच करूनही कुठलाच उपयोग न झाल्यामुळे गोरेगाव गावातील विद्यार्थ्यांनी थेट बीएसएनएल कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत पालक तसेच छावा संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंकर वाकोडे हेही होते. यावेळी भाजपाचे आमदार रणजित सावरकर यांनाही बोलावण्यात आले होते.