अकोला -जिल्हा प्रशासनाला आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 8 महिला आणि 11 पुरुष आहेत. 155 अहवालांपैकी 136 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर, 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1361 वर पोहोचली आहे.
आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 5 जण अकोट फैल येथील, 3 जण गुलजारपुरा येथील, 3 जण लाडीस फैल, दोघे हरिहर पेठ येथील तर उर्वरित रुग्णांमध्ये राधाकृष्ण प्लॉट, आंबेडकरनगर, कमला नेहरू नगर, तारफैल, इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. यामध्ये 8 महिला व 11 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.