अकोला- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यामध्ये आज नऊ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 वर पोहोचली आहे. त्यामुळे, अकोलाकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण हा बाळापूर तालुक्यातील अंत्री या गावातील आहे.
अकोल्यात ९ नवे कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 64 वर - अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 81 जणांपैकी 72 जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 9 जण हे कोरोनाबाधित आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी पाचजण कृषीनगर येथील रहिवासी आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 81 जणांपैकी 72 जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 9 जण हे कोरोनाबाधित आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी पाचजण कृषीनगर येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित चौघांपैकी कोठडी बाजार, लाल बंगला, बैदपुरा येथील रुग्ण आहेत.