अकोला- जिल्ह्यातील आणखी नऊ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याशिवाय दहा जणांनी शनिवारी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अकोल्यात आढळले कोरोनाचे नऊ नवे रुग्ण, दहा जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील आणखी नऊ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याशिवाय दहा जणांनी शनिवारी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या नऊ रुग्णांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पाच जण तेल्हारा येथील आहेत. उर्वरित रुग्ण राऊतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर, एका ६० वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला माळीपूरा येथील रहिवासी होती. 20 मे रोजी महिला रुग्णालयात दाखल झाली होती.
डिस्चार्ज देण्यात आलेले दहाही रुग्ण पुरुष आहेत. या सगळ्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यात दोघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य आळशी प्लॉट, अकोट फ़ैल, खैर मोहम्मद प्लॉट, नानक नगर, इमानदार प्लॉट, समता नगर, मोमीनपुरा, रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 387 रुग्ण आहेत. यातील 229 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 24 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 134 जणांवर उपचार सुरु आहे.