अकोला - जिल्ह्यात आज सायंकाळी आलेले सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळी 11 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे आज नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अकोल्यासाठी ही वार्ता सुखद असली तरी क्षणभंगुर ठरू शकते.
अकोल्यात ९ जणांची कोरोनावर मात; नव्या ११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह - अकोला कोरोना पेशंट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आलेल्या दिवसभरातील 18 अहवालात 11 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. तर नऊ जणांना सुटी देण्यात आली आहे. त्यापैकी सात जणांना संस्थात्मक अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आलेल्या दिवसभरातील 18 अहवालात 11 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. तपासणी अहवालाची संख्या जरी कमी असली तरी या संखेतून रुग्णांची संख्या त्यामानाने जास्त आहे. ही चिंताजनक बाब आहे. तर नऊ जणांना सुटी देण्यात आली आहे. त्यापैकी सात जणांना संस्थात्मक अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्याची सद्यस्थिती-
आज प्राप्त अहवाल- ५३
पॉझिटिव्ह- ११
निगेटीव्ह- ४२
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५८१
मृत -३२ (३१+१)
डिस्चार्ज- ४३२
अॅक्टिव्ह रुग्ण - ११७