अकोला - अकोल्यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला मिळालेल्या 54 जणांच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 1082 रुग्ण पोहोचली आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोघे अशोकनगर, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरीत दगडीपूल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शी टाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
जिल्हा प्रशासनाला आज मिळालेल्या 54 अहवालापैकी 45 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1082 वर पोहोचले असून 676 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 56 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 350 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्राप्त अहवाल-५४
पॉझिटिव्ह-०९