महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात रुग्णांची संख्या वाढतीच, आणखी 22 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - कोरोना अपडेट्स अकोला बातमी

अकोला जिल्ह्यातील आज प्राप्त अहवालात 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 10 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे.

22 जन सापडले पॉझिटीव्ह
22 जन सापडले पॉझिटीव्ह

By

Published : Jun 29, 2020, 4:20 PM IST

अकोला -जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी प्राप्त कोरोना तपासणी अहवालात 22 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 263 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यामधून 241 जण निगेटिव्ह आले आहेत.

सकाळी प्राप्त 22 पॉझिटिव्ह अहवालात 10 महिला व 12 पुरुष आहेत. या 22 जणांपैकी चारजण गजानन नगर, चारजण कळंबेश्वर येथील, तीनजण गाडगेनगर, दोनजण हरिहर पेठ. दोनजण सिंधी कॅम्प, तर दगडी पुल, अकोट फैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर येथील प्रत्येकी एकजण याप्रमाणे रहिवासी आहेत.

प्राप्त अहवाल - २६३
पॉझिटिव्ह अहवाल - २२
निगेटिव्ह - २४१

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १५३२
मृत - ७७ (७६+१)
डिस्चार्ज - १०७५
दाखल रुग्ण (अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३८०

ABOUT THE AUTHOR

...view details