महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात आज कोरोनाच्या 30 रुग्णांची भर तर, 18 जण कोरोनामुक्त - अकोला कोरोना आकडेवारी

आज जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सकाळी प्राप्त अहवालांमध्ये 15 तर, संध्याकाळी आणखी 15 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. संध्याकाळी प्राप्त 15 अहवालात सात महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे.

अकोल्यात आज कोरोनाच्या 30 रुग्णांची भर
अकोल्यात आज कोरोनाच्या 30 रुग्णांची भर

By

Published : Jun 19, 2020, 9:02 PM IST

अकोला - येथे आज(शुक्रवार) सायंकाळी प्राप्त अहवालात 15 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सकाळीदेखील एवढेच रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे आजची एकूण रुग्णसंख्या ही 30 वर गेली आहे. तसेच सकाळी एका रुग्णाचा मृत्यूदेखील झाला आहे. तर, 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

आज जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सकाळी प्राप्त अहवालांमध्ये 15 तर, संध्याकाळी आणखी 15 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. संध्याकाळी प्राप्त 15 अहवालात सात महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट फैल येथील तीन, सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अनिकट, आदर्श कॉलनी, अकोट, बाळापूर, हरिहर पेठ, आंबेडकर चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, दुपारनंतर 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील 11 जणांना घरी तर सात जणांना कोव्हीड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

प्राप्त अहवाल - २७७

पॉझिटिव्ह - ३०

निगेटिव्ह - २४७

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ११३६

मृत - ५९ (५८+१)

डिस्चार्ज - ७४२

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३३५

ABOUT THE AUTHOR

...view details