अकोला -आज (रविवारी) सकाळी कोरोनाच्या प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णांपैकी ११ महिला व २७ पुरुष आहेत. त्यातील आठ जण पक्की खोली येथील, सात जण आदर्श कॉलनी, सात जण अकोट, पाच जण चांदूर, दोन जण बार्शी टाकळी, दोन जण कच्ची खोली तर उर्वरीत राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव, पातुर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८२ वर्षीय पुरुष असून तो २ जुलै रोजी दाखल झाला होता. काल ४ जुलै च्या रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
*प्राप्त अहवाल-११९
*पॉझिटीव्ह-३८
*निगेटीव्ह-८१
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल - १७०३
*मयत - ८९(८८+१)
*डिस्चार्ज १२५५
*दाखल रुग्ण(ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३५९