अकोला - कोरोना तपासणी अहवालात आज सकाळी 16 जण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सायंकाळी आणखी 17 रुग्णांची भर पडलीय. यामुळे आज दिवसभरात एकूण 33 रुग्ण सापडले आहेत.
आणखी 17 रुग्ण पॉझिटिव्ह; दिवसभरात सापडले 33 रुग्ण - akola corona news
कोरोना तपासणी अहवालात आज सकाळी 16 जण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सायंकाळी आणखी 17 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे अकोल्यामध्ये आज दिवसभरात एकूण 33 रुग्ण सापडले आहेत.

आज आढळलेल्या 17 जणांमध्ये दहा पुरुष तर सात महिला आहेत. यामध्ये सोनटक्के प्लॉट जुने शहर येथील तीन जण, जोगळेकर प्लॉट डाबकीरोड येथील चौघे, तर रेवतीनगर बाळापूर नाका, डाबकी रोड, देशमुख फैल, डाबकीरोड, अकोट फैल, सावंतवाडी, सिव्हील लाईन्स, जुने शहर, लकडगंज रामदास पेठ, मोमीनपुरा, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी एक जण रुग्ण आहे. रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच अन्य व्यक्तींना ट्रेस करण्याचे काम सुरू आहे
सद्यस्थिती
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ३४१
*मयत - २१ (२०+१)
*डिस्चार्ज - १९१
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह) - १२९