अकोला - अकोल्यात बुधावारी सायंकाळी आलेल्या तपासणी अहवालातून 9 जण कोरोना बाधित सापडले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. यात पाच महिला व चार पुरुष आहेत. प्राप्त झालेल्या 247 अहवालांपैकी 29 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर, 218 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
अकोल्यात आणखी नऊ कोरोना रुग्ण सापडले; दिवसभरात 29 रुग्ण दाखल
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या नऊ रुग्णांपैकी दोन जण न्यू तारफैल, दोन जण समता नगर तर उर्वरित प्रत्येकी खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मी नगर, देशमुख फैल, अडगाव ता. अकोट, पूरपिडीत क्वार्टर्स अकोट फैल येथील रहिवासी आहेत. आतापर्यंत 247 जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यामध्ये 218 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या नऊ रुग्णांपैकी दोन जण न्यू तारफैल, दोन जण समता नगर तर उर्वरित प्रत्येकी खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मी नगर, देशमुख फैल, अडगाव ता. अकोट, पूरपिडीत क्वार्टर्स अकोट फैल येथील रहिवासी आहेत. 247 जणांचे अहवाल तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये 218 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. त्यामुळे अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन हे अपयशी ठरत आहे.