अकोला - अकोल्यात आज सायंकाळी आलेल्या तपासणी अहवालात आणखी दहा रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात आज 19 रुग्ण सापडले. सायंकाळी सापडलेल्या दहा रुग्णांपैकी सात पुरुष आहेत. अकोल्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या दहा रुग्णांपैकी सात पुरुष व तीन महिला आहेत. त्यातील एक महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी सात जण हे न्यू तारफैल येथील रहिवासी आहेत. तर अन्य शासकीय गोदाम सिंधी कॅम्प, अशोक नगर, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
प्राप्त अहवालानुसार -
अकोल्यात सापडले आणखी दहा रुग्ण; सात एकाच परिसरातील! - akola covid 19 update
अकोल्यात आज सायंकाळी आलेल्या तपासणी अहवालात आणखी दहा रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात आज 19 रुग्ण सापडले. सायंकाळी सापडलेल्या दहा रुग्णांपैकी सात पुरुष आहेत. अकोल्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या दहा रुग्णांपैकी सात पुरुष व तीन महिला आहेत.
अकोल्यात आणखी दहा रुग्ण सापडले
प्राप्त अहवाल - १८५
पॉझिटिव्ह - १९
निगेटिव्ह - १६६
आता सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ३९७
मृत - २४(२३+१)
डिस्चार्ज - २२९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - १४४