अकोला- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत दहा जणांची वाढ झाली आहे. त्यामध्ये ५ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. तर दिवसभरात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक महिला उपचारादरम्यान मृत्यू पावली. तर दुसऱ्या महिलेचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला आहे.
CORONA : अकोल्यात आणखी दहा जण पॉझिटिव्ह; दोन महिलांचा मृत्यू - अकोला कोरोना रुग्णांची संख्या
गेल्या २४ तासात आज एक आणि गुरुवारी (दि.१४) एक अशा एकूण दोन महिलांचा मृत्यू झाला. यातील एक ३७ वर्षीय महिला जी फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे, तिचा मृत्यू काल (दि.१४) झाला मात्र तिचा अहवाल आज प्राप्त झाला व अन्य एक ६५ वर्षीय महिला ११मे पासून रुग्णालयात दाखल होती, मात्र उपचारादरम्यान आज तिचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आढळलेल्या दहा रुग्णांपैकी हे चार जण आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्ड मागे, दोन फिरदौस कॉलनी, दोन भीम चौक, अकोट फैल तर गवळीपुरा व पंचशिल नगर, वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक जण आहेत. गेल्या २४ तासात आज एक आणि गुरुवारी (दि.१४) एक अशा एकूण दोन महिलांचा मृत्यू झाला. यातील एक ३७ वर्षीय महिला जी फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे, तिचा मृत्यू काल (दि.१४) झाला मात्र तिचा अहवाल आज प्राप्त झाला व अन्य एक ६५ वर्षीय महिला ११मे पासून रुग्णालयात दाखल होती, मात्र उपचारादरम्यान आज तिचाही मृत्यू झाला आहे.
- आज प्राप्त अहवाल-१६१
पॉझिटिव्ह-११
निगेटिव्ह-१५०
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२१८
एकूण मृत्यू -१७ (१६+१),
डिस्चार्ज-१००
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०१