महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात ‘नीट’ शांततेत पार, परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद - neet exam conducted in peace akola

नीट परीक्षेसाठी ८ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. परीक्षेला दुपारी २ वाजता सुरुवात झाली. कोविडमुळे परीक्षा केंद्रावरील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत २५-२५ टक्के विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने परीक्षेसाठी सकाळी ११ वाजतापासून सोडण्यात आले होते.

नीट परिक्षा
नीट परिक्षा

By

Published : Sep 13, 2020, 8:35 PM IST

Updated : Sep 13, 2020, 9:06 PM IST

अकोला- देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. अशा गंभीर परिस्थितीत आज जिल्ह्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ची परीक्षा पार पडली. शहरातील १९ व अकोट येथील २ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आत परीक्षा देत होते, तर त्यांचे पालक चिंतेत केंद्राबाहेर उभे होते.

प्रतिक्रिया देताना पालक आणि विद्यार्थिनी

नीट परीक्षेसाठी ८ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. परीक्षेला दुपारी २ वाजता सुरुवात झाली. कोविडमुळे परीक्षा केंद्रावरील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत २५-२५ टक्के विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने परीक्षेसाठी सकाळी ११ वाजतापासून सोडण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तपासणीनंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर दुपारी २ वाजता परीक्षेला सुरूवात झाली. मुले परीक्षा केंद्राच्या आत गेले, मात्र पालक बाहेर मुलांच्या परिक्षेसदर्भात चिंताग्रस्त होते.

परीक्षा केंद्रावर पालक मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी बसून होते. अनेकांनी तिथेच जेवण केले, तर काहींनी डुलक्याही दिल्यात. मुलांच्या भविष्याबाबतच सर्वांच्या चर्चा रंगल्या. सायंकाळी ५ वाजता परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पडले. त्यानंतर मुलांनी आणि पालकांनी परिक्षा संपल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी, परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा-अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

Last Updated : Sep 13, 2020, 9:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details