अकोला- कृषी विद्यापीठांमधील अनेक पदे रिक्त आहेत, ती भरणे गरजेचे आहे. यासोबतच या विद्यापीठांमध्ये होणाऱ्या संशोधनासाठी सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यास आधुनिक तंत्रज्ञान अधिक वेगाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा अर्थसंकल्पाकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केली. या सोबतच तंत्रज्ञान, बायोडीजल, इथेनॉल, तेल प्रक्रिया उद्योग निर्माण केल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
'कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरणे आणि नव संशोधनासाठी निधी मिळणे गरजेचे' - अकोला कृषी विद्यापीठ
बायो इंधनाचा वापर करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करून पेट्रोल, डिजेल या इंधनावरील होणारा खर्च कमी करता येऊ शकतो. बायो इंधनाचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांना चार पैसे शिल्लक मिळण्यास मदत होईल, तसेच उसापासून साखरेसोबत इथेनॉल तयार केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होण्याची शक्यता असल्याचे मत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केले.
देशामध्ये कृषी उद्योग हा सर्वात मोठा उद्योग असून कोरोनाच्या काळामध्ये हा उद्योग भरभराटीत होता. देशातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारकडून भरीव अशी मदत होणे अपेक्षित आहे. जेणेकरून शेतकऱ्यांनाही शेतीचा फायदा होईल व युवा शेतकरी हा गावातच राहून शेतीपूरक उद्योगात भविष्य उज्ज्वल करेल. सूर्यफूल आणि भुईमूग या पिकांना प्रोत्साहित केल्यास यापासून निर्माण होणाऱ्या तेलांच्या प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. विदेशातून आणण्यात येणारे तेल हे थांबतील. यासोबतच शेतकऱ्यांसमोर असलेल्या मजुरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांना नव तंत्रज्ञानाची जोड भक्कमपणे उभे करण्याची गरज आहे. बायो इंधनाचा वापर करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करून पेट्रोल, डिजेल या इंधनावरील होणारा खर्च कमी करता येऊ शकतो. बायो इंधनाचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांना चार पैसे शिल्लक मिळण्यास मदत होईल, तसेच उसापासून साखरेसोबत इथेनॉल तयार केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा पण चांगला फायदा होण्याची शक्यता असल्याचे मत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केले.