महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंधन दरवाढ विरोधात आंदोलन - fuel price hike oppose Ujjwala Raut

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वतःचे पोस्टर लावून आपली प्रतिमा चांगली असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंधन दरवाढ करून पंतप्रधानांनी नेमके काय साध्य केले, असा सवाल करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंप येथे आज आंदोलन करण्यात आले.

fuel price hike oppose Ujjwala Raut
इंधन दरवाढ विरोध उज्ज्वला राऊत अकोला

By

Published : Feb 28, 2021, 8:22 PM IST

अकोला - देशामध्ये केंद्र सरकारने इंधन आणि गॅस दरवाढ करून महागाईला मोठ्या प्रमाणात खतपाणी घातले आहे. सामान्य नागरिकांचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वतःचे पोस्टर लावून आपली प्रतिमा चांगली असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंधन दरवाढ करून पंतप्रधानांनी नेमके काय साध्य केले, असा सवाल करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंप येथे आज आंदोलन करण्यात आले.

माहिती देताना महिला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) उज्ज्वला राऊत

हेही वाचा -अकोला जिल्ह्यातील संचारबंदीचा विदर्भ चेंबर्स असोसिएशनने केला विरोध

पेट्रोल-डिझेल या सोबतच गॅस दरवाढ करून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात महागाई वाढवीत आहे. सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. त्यासोबतच गॅस दरवाढ करून केंद्र सरकार सामान्य नागरिकांना मोठा फटका देत आहे. महिलांचे घरातील बजेट बिघडवून केंद्र सरकार कशाप्रकारे शांत राहू शकते, हीच गंभीर बाब आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून केली. हे आंदोलन महिला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) उज्ज्वला राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी खदान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

हेही वाचा -अकोला परिमंडळात 48 तासात 340 वीज चोरांवर वीज वितरण कंपनीची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details