महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रस्थापितांकडे झुकल्याने राष्ट्रवादी संपत आहे - विनायक मेटे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 12 जागा मागितल्या असून या सर्व जागा अशाच आहेत जिथे शिवसेना आणि भाजपचा सध्या आमदार नाही. अकोल्यातसुद्धा एक जागा मगितल्याची माहीती विनायक मेटे यांनी यावेळी दिली.

प्रस्थापितांकडे झुकल्याने राष्ट्रवादी संपत आहे - विनायक मेटे

By

Published : Aug 2, 2019, 5:53 PM IST

अकोला - "राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रस्थापित नेत्यांचा पक्ष झाला असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष राहिला नाही. जोपर्यंत हे चित्र बदलणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये असेच सुरू राहणार" असा घणाघात करत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रस्थापितांकडे झुकल्याने राष्ट्रवादी संपत आहे - विनायक मेटे

मेटे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आर. आर. पाटील हे सर्वसामान्यांचे नेतृत्व होते. त्यांच्यानंतर कुणीच या पक्षात सर्वसामान्यांकडून नेता म्हणून समोर आले नाही. नेत्यावर आधारित पक्षाऐवजी कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष बनत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीत असेच चालणार आहे. 2004 नंतर राष्ट्रवादी प्रस्तापितांकडे झुकली. तेव्हापासूनच हा पक्ष संपायला सुरूवात झाली होती. शरद पवार यांना या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात जावे लागत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रत्येक पक्षात पवारांवर प्रेम करणारे नागरिक आहेत, असेही मेटे म्हणाले.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 12 जागा मागितल्या असून या सर्व जागा अशाच आहेत जिथे शिवसेना आणि भाजपचा सध्या आमदार नाही. अकोल्यातसुद्धा एक जागा मगितल्याची माहीती विनायक मेटे यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details