अकोला -सीसीआय अंतर्गत कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने सीसीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सीसीआयचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली, वाद वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
सीसीआयच्या खरेदी केंद्रावर 15 हजार क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा आहे. मात्र, ही मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या कापूस खरेदी केंद्रावर दररोज 60 हजार क्विंटल कापसाची आवक होते. मात्र खरेदी केंद्राची मर्यादा कमी असल्याने, शेतकऱ्यांना कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केंद्रातच मुक्काम करावा लागतो. त्यामुळे खरेदीची मर्यादा वाढवावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.