महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

maratha reservation - मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका दुटप्पी - नरेंद्र पाटील - मराठा आरक्षण

प्रकाश आंबेडकर यांची भूमिका मराठा आरक्षणाबाबत नेहमी बदलत आलेली आहे. मराठा आरक्षण मिळाले तेव्हा त्यांची भूमिका ही वेगळी आणि आता आरक्षण गेले तर त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. आता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील

By

Published : May 30, 2021, 9:03 PM IST

अकोला - प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यात मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्द्यावर भेट झाली. या भेटीबद्दल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही दुटप्पी असल्याचे सांगितले. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका मराठा आरक्षणाबाबत नेहमी बदलत आलेली आहे. मराठा आरक्षण मिळाले तेव्हा त्यांची भूमिका ही वेगळी आणि आता आरक्षण गेले तर त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. आता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांची अशी दुटप्पी भूमिका आणि अशा दुटप्पी भूमिकेच्या नेत्यांबरोबर कशाप्रकारे काम करणार हा मोठा प्रश्न आहे, असेही यावेळी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

नरेंद्र पाटील

'महाविकास आघाडी सरकार दिशाभूल करत आहे'

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पाठपुरावा, योग्य कागदपत्रे दिले नाही, म्हणून हे आरक्षण न्यायालयाने नाकारले. राज्य सरकार, महाविकास आघाडी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करतात. लोकांची दिशाभूल करतात. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. उच्च न्यायालयात आरक्षण मिळते तर सर्वोच्च न्यायालयात ते फेटाळली जाते. यामध्ये कोण कमी पडले, कोणी दिशाभूल केली हे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते, म्हणून हा दौरा असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा-maratha reservation - मराठ्यांचे नेते कमी पडले कारण ते राजकारणात गेले - नरेंद्र पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details