अकोला - नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना मन:स्ताप सहन करावा लागला. यावर्षी अकोल्यात पहिल्यांदाच 'नीट' परीक्षेसाठी केंद्रे देण्यात आली. मात्र, अनेक परिक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नव्हती. तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांना मंडप नसल्याने उन्हातच ताटकळत उभे राहावे लागले. तेव्हा नोएल शाळेला लागून असलेल्या मस्जिदमधील मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा परिचय देत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली.
नीट परीक्षा केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम बांधवांकडून पाण्याची व्यवस्था - पाणी
नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. भावी डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक नीट परीक्षा शहरात १५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. भावी डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक नीट परीक्षा शहरात १५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. अकोल्यात तापमानाचा पारा वाढला असताना भर दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परिक्षेसाठी बोलावण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा परीक्षा केंद्रावर पोहचले. मात्र, संबधीत प्रशासनाने परीक्षा केंद्राबाहेर, प्रवेशद्वार येथे उभे राहण्यासाठी सावलीची व्यवस्था केलेली नव्हती. कडक उन्हात पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते.
ही बाब लक्षात येताच नोएल शाळेला लागून असलेल्या मस्जिदमधील मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा परिचय देत विद्यार्थी आणि त्यांचे नातेवाईक यांना सावलीत उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. या व्यतिरिक्त परीक्षा शांततेत पार पडली.