अकोला -इंडियन युनियन मुस्लीमलीग आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यभरात 22 जागा लढणार आहे. त्यापैकी नांदेड, वर्धा, हिंगोली अशा ३ जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरित 19 जागा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी दिली.
मुस्लीम लीग राज्यात 22 जागा लढवणार - प्रदेशाध्यक्ष अफसर अली - state
या विभागलेल्या सर्व मुस्लीम समाजातील लोकांना एकत्र करण्यासाठी इंडियन युनियन मुस्लिम लीग पार्टी पुन्हा एकदा निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याचे अफसर म्हणाले.
इंडियन युनियन मुस्लीमलीग ही पार्टी पूर्वी अकोल्यात चांगल्या स्थितीत होती. त्यानुसारच अकोला महानगर पालिकेच्या विरोधी पक्षात मुस्लिम लीगने महत्वाची भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर अकोल्यात मुस्लीमलीगचे काम रोडावले होते. त्यातच समाजवादी पक्ष, एमआयएम आणि इतर मुस्लीमविचारधाराच्या पक्षांनी अकोल्यात वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र, सर्व विफल ठरले. त्यामुळे मुस्लीम समाज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये विभागला गेला आहे. या विभागलेल्या सर्व मुस्लीम समाजातील लोकांना एकत्र करण्यासाठी इंडियन युनियन मुस्लीम लीग पार्टी पुन्हा एकदा निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याचे अफसर म्हणाले. आघाडीसंदर्भात काँग्रेससोबत ३ बैठका झाल्या. पण काँग्रेसकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे मुस्लीम लीग स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुक लढणार आहे. मुस्लीम लीग विधानसभेची निवडणुकही लढणार असल्याचे अफसर म्हणाले.
अकोल्यात रिक्त असलेले जिल्हाध्यक्षपद अॅड. नजीब शेख यांना देऊन त्यांची महाराष्ट प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुका प्रमुख व इतर नियुक्त्याही घोषीत करण्यात आल्या आहेत.