अकोला -एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात मुस्लीम समाजातर्फे कँडल मार्च काढण्यात आला. शहरातील स्वराज्य भवनापासून निघालेल्या मार्चचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला.
#CAA : एनआरसी विरोधात कँडल मार्च; अकोल्यात मुस्लीम समाज रस्त्यावर - akola collector office
एनआरसी आणि सीएए कायद्याबद्दल अनेक ठिकाणी विरोध दर्शवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोल्यातही मुस्लीम समाज तसेच अन्य काही संघटनांकडून विरोधासाठी मार्च काढण्यात आला.
![#CAA : एनआरसी विरोधात कँडल मार्च; अकोल्यात मुस्लीम समाज रस्त्यावर muslim agitates in akola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5878783-thumbnail-3x2-candal.jpg)
एनआरसी आणि सीएए कायद्याबद्दल अनेक ठिकाणी विरोध दर्शवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोल्यातही मुस्लीम समाज तसेच अन्य काही संघटनांकडून विरोधासाठी मार्च काढण्यात आला. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्वराज्य भवन येथून निघून फतेह चौकात हा मार्च आला. त्यानंतर गांधी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर या मार्चचा समारोप करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. तसेच हा कायदा रद्द करण्याची मागणी उपस्थितांनी केली आहे.