अकोला- महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार झाले. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, परिसरातील नागरिकांकडून त्यांची अवहेलना करण्यात येत होती. ही बाब मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना कळताच; त्यांनी या दोन्ही कोरोनामुक्त सफाई कामगार यांच्या घरी जाऊन भेट दिली.
कोरोनामुक्त सफाई कामगारांच्या घरी मनपा आयुक्तांनी पिले पाणी; नागरिकांची काढली समजूत - कोरोना अकोला
कोरोना झालेल्या रुग्णांकडे तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांकडे समाजात संशयाने बघितले जात आहे. अकोल्यातही दोन सफाई कर्मचारी कोरोनातून बरे झाल्यानंतर परिसरात त्यांची अवहेलना केली जात असल्याचा प्रकार घडला. यावेळी पालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी भेट देऊन लोकांची समजूत काढली.
कापडणीस यांनी त्या रुग्णांच्या घरी त्यांच्या हातून पाणी पिले. तसेच त्यांनी परिसरातील नागरिकांची समजूतही काढली. मनपा आयुक्तांच्या या कृतीमुळे कोरोना मुक्त झालेल्या सफाई कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळाले असून नागरिकांमधील असलेला गैरसमज दूर झाला आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण व त्याच्या कुटुंबाकडे संशयाने पहिल्या जात असून त्यांच्यासोबत दुजाभाव केल्याचा प्रकार होत असल्याच्या घटना घडत आहे. यामुळे समाजात वेगळे वातावरण निर्माण होत असून रुग्णांच्या कुटुंबाना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. समाजातील ही वैचारिक घाण दूर होणे गरजेचे झाले आहे. परंतु, याबाबत अनेक गैरसमज असल्याने हा प्रकार वाढणे गंभीर आहे. महापालिकेच्या दोन सफाई कामगारांना कोरोना झाला होता. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते घरी आले. परंतु, त्यांच्या घरातील परिसरातील नागरिक यांच्याकडून त्यांना दुजाभाव दिल्या जात असल्याचा प्रकार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना कळली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता या सफाई कामगारांच्या घरी भेट दिली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या घरात त्यांच्या हातून पाणी ही पिले. तसेच परिसरातील नागरिकांची समजूत काढून त्यांच्यांशी सलोख्याने राहण्याची विनंती मनपा आयुक्त कापडणीस यांनी केली. आयुक्तांच्या या कृतीमुळे एक आदर्श निर्माण झाला असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.