अकोला- नागपूरला आरएसएसचे मुख्यालय आहे. या मुख्यालयावर तिरंगा फडकविण्यासाठी आरएसएसला 60 वर्षे लागली. जेव्हा नागपूरमधील लोकांनी विरोध केला. तेव्हा कुठे मुख्यालयावरती तिरंगा फडकविण्यात आला, असा घणाघाती टोला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केला. आरएसएसचा विश्वास आणि समर्पण तिरंग्यासाठी नाही. तिरंग्या करिता त्यांनी कधीच संघर्ष किंवा रक्त सांडले नसल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणातून केला. आरएसएस, भाजप आणि शिवसेना काँग्रेसला बलिदानाचे महत्व कसा सांगणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
'आरएसएसला मुख्यलयावर तिरंगा फडकवण्यासाठी 60 वर्षे लागली' - BJP
नागपूरला आरएसएसचे मुख्यालय आहे. या मुख्यालयावर तिरंगा फडकविण्यासाठी आरएसएसला 60 वर्षे लागली, असा टोला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक लगावला.
अकोट येथील काँग्रेसचे उमेदवार संजय बोडके यांच्या प्रचार सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह आधी नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर विधीद्वारे कारवाई महाराष्ट्रात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांचा कुठलाही संबंध नसतानाही त्यांच्यावर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. शरद पवार यांच्यावर झालेली कारवाई ही महाराष्ट्र घडविणाऱ्यामध्ये ज्या व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यामध्ये त्यांचे नाव आहे. त्यामुळे ही कारवाई भाजप सरकारने शरद पवार यांच्यावर नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान करण्यासाठी केल्याचा आरोपही काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी शेवटी केला. यावेळी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनीही भाजप-सेनेवर आरोप करीत या युती सरकारला पुन्हा सत्तेत आणू नका, असे आवाहन मतदारांना केले.
हेही वाचा - असदुद्दीन ओवैसींच्या सभेला 5 तास उशीर; 6 मिनिटांत उरकले भाषण