अकोला -तुम्ही एटीएम कार्ड वापरात आहात. तर ते काळजी पूर्वक वापरा. कारण तुम्ही एटीएम कार्डचा उपयोग केल्यानंतर आठवड्याच्या आतच तुमच्या कार्डचा अज्ञात व्यक्तीने परस्पर उपयोग करून त्यातील रक्कम काढल्याचा प्रकार घडला आहे. तुमच्याकडे कार्ड असताना तुमच्या खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार अकोल्यात घडला आहे. डाबकी रोड पोलीस ठाण्यात अशा नऊ तक्रारी दाखल झाल्या असून डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाबकी रोडवरील एसबीआयच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. जवळपास दीड ते दोन लाखांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे.
डाबकी रोडवरील वाडेकर किराणा शॉप समोरील एसबीआयच्या एटीएममधून १० ते १२ डिसेंबर दरम्यान पैसे काढलेल्यांचे परस्पर पैसे काढल्या जात आहेत. अशा नऊ जणांचे सोमवारपर्यंत पैसे काढण्यात आले. मोबाइलवर एसएमएस आल्यानंतर हे उघड होत आहे. त्यामुळे या एटीएममधून पैसे काढणाऱ्यांनी सावधान होण्याची वेळ आहे. कारण की या एटीएममध्ये बहुतांश जणांचे एटीएम कार्ड क्लोनिंग झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोनिंग केल्याचेच हे प्रकार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण -
१० डिसेंबर रोजी रेखा भरतराव बगाळे यांनी याच एटीएममधून पैसे काढले होते. त्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डमधून परस्पर ४० हजार रुपये १५ डिसेंबर रोजी काढले. तसा त्यांना एसएमएस आला. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी मधुकर हिवराळे यांनी ही त्याच एटीएम मधून पाच हजार रुपये काढले. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी त्यांना त्यांच्या खात्यातून दहा हजार रुपये काढण्यात आले. तसा मेसेज त्यांना आला. थोड्यावेळाने त्यांना सहा हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. एकाच दिवशी त्यांच्या खात्यातून16 हजार रुपये काढण्यात आले. त्यांनी याबाबत आज स्टेट बँक, डाबकी रोड पोलिस ठाने, सायबर शाखेत तक्रार दाखल केली आहे.