अकोला - संचारबंदीच्या काळातील वीजबिल माफ करू नंतर या बिलात सूट देऊ, अशी घोषणा करून राज्यातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
वीजबिल माफीवरुन मनसे आक्रमक, उर्जामंत्र्यांविरोधात तक्रार दाखल राज्यातील नागरिकांची फसवणूक
संचारबंदीच्या काळामध्ये वीज वितरण कंपनीने अवास्तव बिल आकारले आहे. वीज कंपनीच्या ग्राहकांचे त्यांनी आर्थिक लूट केली आहे. हा प्रकार ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी संचारबंदीच्या काळातील दोन ते तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी तो शब्द फिरवला. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी वीज बिलात सूट देऊ, असेही आश्वासन दिले होते. परंतु, तोही शब्द त्यांनी पाळला नाही. राऊत यांनी भूलथापा देऊन राज्यातील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
वीजबिल माफीवरुन मनसे आक्रमक, उर्जामंत्र्यांविरोधात तक्रार दाखल ग्राहकांमध्ये रोष
सध्या वीज वितरण कंपनी संचारबंदीच्या काळातील वीजबिल ग्राहकांकडून वसूल करीत आहे. सक्तीने वसुली करण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांची केलेल्या फसवणुकीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. यावेळी मनसेचे पदाधिकारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात उपस्थित होते.