अकोला: महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवरून दिवसेंदिवस वाद पेटत आहे. यादरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी अमरावतीतील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार देशमुख यांचा पापाचा घडा भरला, असा आरोप आमदार राणा यांनी केला होता. त्यावर आमदार देशमुख यांनी आमदार राणा (Nitin Deshmukh Critics on Ravi Rana) यांचा चांगलाच समाचार घेत त्यांना ***खोर असे म्हणून त्यांची जीभ घसरली.
MLA Nitin Deshmukh : काय ती भाषा! आमदार देशमुखांची राणांवर बोलताना जीभ घसरली - Nitin Deshmukh Critics
आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्याबद्दल व्यक्तव्य करीत त्यांचा पापाचा घडा भरला आहे, असे वक्तव्य केले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार देशमुखांची (Nitin Deshmukh Critics on Ravi Rana) जीभ घसरली.
![MLA Nitin Deshmukh : काय ती भाषा! आमदार देशमुखांची राणांवर बोलताना जीभ घसरली MLA Nitin Deshmukh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17448098-thumbnail-3x2-akola.jpg)
देशमुखांची जीभ घसरली : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या बद्दल व्यक्तव्य करीत त्यांचा पापाचा घडा भरला आहे, असे वक्तव्य अमरावतीच्या माध्यमांसमोर केले. या टीकेला आमदार देशमुख प्रत्युत्तर देत म्हणाले की, कोण रवी राणा, रवी राणा हा **ला खूप मोठा झाला का. रवी राणा तुझा पापाचा घडा भरला आहे, ***खोर येणाऱ्या निवडणुकीत तुला दिसेल, असे म्हणत आमदार देशमुख यांची जीभ घसरली. मराठी माणसाच्या भरवशावर मोठा झाला. हा मराठी माणसांना शिकवणार का, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार नितीन देशमुख यांनी केला. तुझी औकात काय, मराठी माणसाच्या भरवशावर मोठा झाला आणि इथे येऊन शिकवू राहिला, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
राणावर जोरदार टीका : आमदार रवी राणा हे बायकोच्या भरवशावर राजकारण करीत आहे. नितीन देशमुख हे बायकोच्या भरवशावर राजकारण करीत नाही. ज्या रवी राणाला त्याची जन्मभूमी कोणती हे माहीत नाही, येथील मराठी माणसांनी त्यांना मोठे केले आहे, तोच मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका ही आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.