महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार अमोल मिटकरींना अर्धांग वायूचा झटका; उपचारानंतर प्रकृती स्थिर - अमोल मिटकरींना अर्धांग वायूचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांना अकोल्यातील एका कार्यक्रमादरम्यान अचानक अर्धांग वायूचा झटका आल्याने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वतः अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

आमदार
आमदार

By

Published : Jul 12, 2021, 4:45 PM IST

Updated : Jul 12, 2021, 7:35 PM IST

अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांना अकोल्यातील एका कार्यक्रमादरम्यान अचानक अर्धांग वायूचा झटका आल्याने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वतः अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

आमदार अमोल मिटकरींना अर्धांग वायूचा झटका; प्रकृती स्थिर

कार्यक्रमात बोलत असतानाच झाला त्रास

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजिका गायिका वैशाली माडे यांचा अकोल्यातील हिंगणा येथील महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, आमदार मिटकरी हे मार्गदर्शन करत असताना अचानक त्यांचा आवाज बदलला आणि तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव कार्यक्रमाला उपस्थितांना झाली. त्यानंतर आमदार मिटकरी यांना तात्काळ अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांती अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून काळजी करण्यासारखे काही नसल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

कार्यक्रमात बोलत असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका!

प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंता..

दरम्यान, या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. परंतु, त्यांना तत्काळ उपचार मिळाल्याने कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन स्वत: यांनी केले आहे.

हेही वाचा -नागपुरच्या दामलेंचा 'अमन' निघाला जबलपुरचा 'मोहम्मद आमिर', आधारकार्डमुळे झाली जन्मदात्यांची भेट

Last Updated : Jul 12, 2021, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details