महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावगुंडाचं क्रौर्य, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दिले सिगारेटचे चटके; मुंडणही केलं - Minor Girl Rape Case

Minor Girl Rape Case : अकोला शहरात एका गुंडानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. (shaving of girl hair) आरोपीनं मुलीला सिगारेटचे चटके देत तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीचे वडील फिर्याद घेऊन गेले असता पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी चालढकल केली. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानंतर शनिवारी (18 नोव्हेंबर) फिर्याद नोंदविली गेली. (torture by stripping girl)

Minor Girl Rape Case
अत्याचार प्रकरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 4:57 PM IST

Updated : Nov 20, 2023, 7:07 PM IST

पीडितेवरील अत्याचार प्रकरणी प्रतिक्रिया

अकोला Minor Girl Rape Case : शहरातील एका गावगुंडानं एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न या गुंडानं केला. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गणेश कुमरेला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्याला 21 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन वर्षांपासून सुरू होता अत्याचार :अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तेथील एका गावगुंडानं दोन वर्षांपासून लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न या गुंडानं केला. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गणेश कुमरेला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

मुलीला, वडिलांना धमक्या :या प्रकरणी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचाराची फिर्याद घेऊन गेले असता फिर्याद लवकर घेतली गेली नाही, असा आरोप वडिलांनी केला आहे. म्हणून त्यांना नैतिक बळ आणि अभय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठलं. मुलीचा जबाब घेताना आरोपी गणेश कुमरे यानं पोलीस ठाण्यामध्ये मुलीला आणि तिच्या वडिलांना धमक्या दिल्याचा आरोप वंचित कडून करण्यात येत आहे. पीडित मुलीवर मागील दोन वर्षांपासून धाकदपटशा आणि धमक्या देऊन आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याचा पीसीआर घेण्यात आला आहे. तो 4 दिवस पोलीस कस्टडीत राहणार आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी सुरू असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. --- अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला


आरोपीचं क्रौर्य :दोन दिवसांपूर्वी पीडितेच्या हाताला सिगारेटचे चटके देण्यात आले. तिचे केस कापून हा आरोपी थांबला नाही. तर तिला स्मशानभूमीत विवस्त्र करण्यात आलं अशी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा:

  1. Thane Crime : ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. kalyan Rape Case : १५ वर्षीय मुलाने ९ वर्ष वयाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या
  3. Rape accused burnt alive in Gumla : बलात्काराच्या आरोपीला नागरिकांनी जिवंत जाळले, झारखंडच्या गुमलामधील घटना
Last Updated : Nov 20, 2023, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details