अकोला- राज्यातील औष्णिक प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी कॉम्प्रेसरची गरज आहे. दुर्दैवाने ते सध्या सरकारकडे उपलब्ध नाही. हे उपलब्ध करून घेण्यासाठी महानिर्मिती कंपनीने निविदा काढली आहे. ही निविदा लवकरच उघडणार आहोत. हे कंप्रेसर उपलब्ध झाले तर लवकरात लवकर ऑक्सिजन सिलिंडर भरता येणार आहे. सर्वच प्रकल्पांमध्ये ही अडचण आहे. त्याचीच पाहणी करण्याकरता राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दिली.
..ऑक्सिजन भरण्यासाठी दुर्दैवाने सरकारकडे कॉम्प्रेसर उपलब्ध नाही - ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे - ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी कॉम्प्रेसरची गरज
ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी कंप्रेसरची गरज आहे. दुर्दैवाने ते सध्या सरकारकडे उपलब्ध नाही. हे उपलब्ध करून घेण्यासाठी महानिर्मिती कंपनीने निविदा काढली आहे. ही निविदा लवकरच उघडणार आहोत. हे कंप्रेसर उपलब्ध झाले तर लवकरात लवकर ऑक्सिजन सिलिंडर भरता येणार आहे. सर्वच प्रकल्पांमध्ये ही अडचण आहे. त्याचीच पाहणी करण्याकरता राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दिली.
![..ऑक्सिजन भरण्यासाठी दुर्दैवाने सरकारकडे कॉम्प्रेसर उपलब्ध नाही - ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे अकोला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11532492-837-11532492-1619343352786.jpg)
पारस औष्णिक प्रकल्पाला त्यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. येथील प्रकल्पात ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यासाठी त्यांनी पारस येथे असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पुढे ते म्हणाले, ऑक्सिजन तुटवडा पडेल किंवा मागणी वाढेल असे कुणालाही वाटले नव्हते. राज्यातील जिथे जिथे औष्णिक प्रकल्प आहेत. तिथे ओझोन तयार होत आहे. तिथून ऑक्सिजन मिळतो., तो या कारणाकरिता वापरता येईल का याची चाचपणी सुरू आहे. ज्या ना त्या माध्यमातून आपली प्राथमिकता ही आहे की लोकांचे जीव वाचविण्यासाठी जिथून कुठून ऑक्सिजन निर्माण होईल, हे सर्व पर्याय शासन शोधत आहे. त्यानुसार परळी, अंबाजोगाई येथे परभणीच्या प्रकल्पातून ऑक्सिजन उपलब्ध करून दिले असल्याचे ते म्हणाले.
आंबेजोगाई रुग्णालयाला आजपासून ऑक्सिजन देण्यास सुरुवात झाली आहे. तिथे रेडिमेट प्रकल्प होते. ते इन्स्टॉल केले व तिथे ऑक्सिजन सुरू झाले आहे. परभणीचा प्लांट आठ दिवसात सुरू होईल. उरलेल्या प्लांटला थोडासा उशीर लागु शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यासाठी कॉम्प्रेसर आवश्यक असून ते सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. ऑक्सिजन तयार होतो तो लो प्रेशरला तयार होत आहे. ऑक्सीजन सिलेंडरमध्ये भरण्यासाठी 150 केजी प्रेशर लागते. त्यासाठी कॉम्प्रेसरची गरज आहे. त्याला अवधी लागू शकतो. राज्यातील कंपनीचे ऑक्सिजन शंभर टक्के बंद करून ते वैद्यकीय कारणासाठी पूर्णपणे वापरल्या जात असल्याचेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.