अकोला- माझ्या दोन मागण्या कृषी विधेयकात समाविष्ट केल्या तर मी भाजपमध्ये प्रवेश करेल, असे विधान राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले होते. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना विचारणा केली असता, त्यांनी बच्चू कडू यांचे भाजपमध्ये स्वागतच आहे, असे म्हटले.
..तर बच्चू कडू यांचे भाजपमध्ये स्वागतच, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे - Bachchu bitter BJP entry Dhotre information
पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता, त्यांची जी मागणी आहे, त्यापेक्षा जास्त देण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नही करीत आहोत. ते जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी ठरवावे कधी यायचे कधी नाही, असे धोत्रे म्हणाले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने कृषी विधेयक पारित केल्याने शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. परंतु, काँग्रेस या विधेयकाबाबत नकरात्मक संदेश पसरवत असून, शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर, पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता, त्यांची जी मागणी आहे, त्यापेक्षा जास्त देण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नही करीत आहोत. ते जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी ठरवावे कधी यायचे कधी नाही, असे धोत्रे म्हणाले.
हेही वाचा-अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन