महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जंगली प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना देणार कुंपण' - Farmer crop news akola

जंगली प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले. मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे दादा भुसे आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

Minister Dada Bhuse comment on Farmer crop
कृषिमंत्री दादा भुसे

By

Published : Feb 6, 2020, 7:22 PM IST

Updated : Feb 6, 2020, 7:51 PM IST

अकोला - जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडात आलेला घास वाया जात आहे. जंगली प्राण्यांमुळे शेतातील उभे पीक खराब होत आहे. यातून सुटका होण्यासाठी शेतकरी शेताच्या बांधावर कुंपण उभारण्यासाठी अनुदानाची मागणी करत आहेत. यासाठी योग्य ते पाऊल उचलून शेतकऱ्यांना यामधून दिलासा देण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

कृषिमंत्री दादा भुसे

हेही वाचा -'तुम्ही रामदेवबाबांना जमिनींची खैरात वाटली तशी आम्ही नाही वाटली'

हेही वाचा -कोरोना व्हायरस: चीनमध्ये मृतांचा आकडा ५६२ : भारतीय दुतावासाने जारी केले हॉटलाईन नंबर

मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो दादा भुसे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. बांधावर कुंपन घालणे हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा प्रकल्प ठरणार आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करेल. त्यासोबतच कोरोना व्हायरसमुळे कापूस निर्यातीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर त्यांनी माहिती घेऊन पुढील उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच पीकविमा आणि कर्जमाफीच्या बाबतीत मार्चपर्यंत शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश सर्व पीक विमा कंपन्यांना तसेच बँकांना दिले आहेत. त्यामुळे मार्चमध्ये हा विषय संपणार, असल्याचे कृषिमंत्री म्हणाले.

Last Updated : Feb 6, 2020, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details