अकोला- समाजातील दुःख पाहून गाडगेबाबांनी अभंग तयार केले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज केले. गाडगेबाबांच्या विचारांमुळेच बच्चू कडू हा इथपर्यंत येऊन पोहोचला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अकोट फाइल परिसरात असलेल्या बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त मीना अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, नगरसेवक राजेश मिश्रा, मनिष हिवराळे यांच्यासह आदी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, सर्वच गोष्टी पैशाने होत नाहीत. पैसा असला की माणसे घरात राहत नाहीत, पैसा पाहिजे असे नाही. अनेकांकडे पैसा भरपूर आहे तर काहींकडे तो काहीच नाही. देशामध्ये तफावत पण आहे, तफावत ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.