महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला : व्यापाऱ्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद; रस्त्यांवर नागरिकांची गर्दी

अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांनी पाच दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्याच दिवशी काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवल्यांनी पुढील चार दिवस हा बंद सुरू राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Merchants' bandh mixed response from traders
व्यापाऱ्यांच्या बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद

By

Published : Sep 25, 2020, 4:06 PM IST

Updated : Sep 25, 2020, 5:38 PM IST

अकोला - कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे व्यापाऱ्यांनी आजपासून पाच दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, या बंदला पहिल्या दिवशीच संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा बंद चार दिवस राहील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या बंदच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली असून नागरिकांनी व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.

व्यापाऱ्यांच्या बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावणे सात हजारपेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे रुग्णांची वाढणारी संख्या प्रशासनासोबत व्यापाऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने पाच दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांमध्ये चेंबरच्या 82 संघटना सहभागी झाल्या होत्या. परंतु, पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. इतर चार दिवस व्यापारी हा बंद यशस्वी करतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

व्यापाऱ्यांचा बंद असला तरीही खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. तर अनेक व्यापारी हे दुकानाचे शटर बंद करुन कामगारांसोबत दुकानाच्या बाहेर उभे आहेत. परिणामी व्यापार्‍यांचा बंद खरंच यशस्वी होईल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Last Updated : Sep 25, 2020, 5:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details