अकोला -गेल्या वर्षी साखरपुडा झाला आणि येत्या २० एप्रिलला विवाहाची तारीख निश्चित झाली. मात्र, कोरोना विषाणूचे संकट आले आणि लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील हयातपूर कुरूम येथील मारोती संस्थान जय माँ चैतन्य शक्ती आत्मिक व आध्यात्मिक सेवा केंद्राच्यावतीने नियोजित विवाह २० एप्रिलला सकाळी ११ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर नवरी मुलगी विवाहानंतर दुचाकीवरून नवरदेवासोबत सासरी रवाना झाली. गेल्या पंधरवड्यात तालुक्यात अशा प्रकारे पार पडलेला हा दुसरा विवाह आहे.
लॉकडाऊन : पाच लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला विवाह, नवरीची दुचाकीवरून पाठवणी
मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा येथील बाळू जगन सोळंके यांची मुलगी स्नेहाचा विवाह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा बुद्रूक येथील अजय चव्हाण यांचा मुलगा आनंद याच्याशी २४ एप्रिल २०१९ ला ठरला होता. यंदा २० एप्रिलला लग्नाची तारीख ठरली. मात्र, सद्यस्थितीत ‘लॉकडाउन’मुळे जमावबंदी असल्याने सगळे रितिरिवाज बाजूला सारून अगदी साध्या पद्धतीने वैदिक रिवाजाप्रमाणे पाच लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचे ठरवले.
मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा येथील बाळू जगन सोळंके यांची मुलगी स्नेहाचा विवाह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा बुद्रूक येथील अजय चव्हाण यांचा मुलगा आनंद याच्याशी २४ एप्रिल २०१९ ला ठरला होता. यंदा २० एप्रिलला लग्नाची तारीख ठरली. मात्र, सद्यस्थितीत ‘लॉकडाउन’मुळे जमावबंदी असल्याने सगळे रीतिरिवाज बाजूला सारून अगदी साध्या पद्धतीने वैदिक रिवाजाप्रमाणे पाच लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचे ठरवले. मारोती संस्थान जय माँ चैतन्य शक्ती आत्मिक व आध्यात्मिक सेवा केंद्राचे संस्थापक गौरीशंकर महाराज, गौरीअम्मा यांच्यावतीने लग्नासाठी लागणारा सर्व खर्च करण्यात आला. विवाहासाठी नवरा मुलगा दुचाकीवरून आपल्या मोजक्याच नातेवाइकांसह लग्नमंडपी दाखल झाला. वधू पक्षाकडून आई, वडील व भाऊ उपस्थित होते. काही निवडक वऱ्हाडी मंडळीची उपस्थिती होती. अशाप्रकारे त्यांचा विवाह पार पडला. लग्नानंतर नववधू स्नेहा दुचाकीवरून नवरदेवासोबत आपल्या सासरी गेली.