अकोला- शहरातील शिवनी भागातील बहुजन नगरमध्ये बुधवारी सायंकाळी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप आढळून आला. या सापाला सर्पमित्र संदीप पाटील यांनी पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले आहे.
शिवनी येथे आढळला दुर्मिळ मांडूळ जातीचा साप
शहरातील शिवनी भागातील बहुजन नगरमध्ये बुधवारी सायंकाळी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप आढळून आला. या सापाला सर्पमित्र संदीप पाटील यांनी पकडून वनविभागाकडे स्वाधीन केले आहे.
हेही वाचा -भाजपचे शिष्ठमंडळ राज्यपालांना भेटणार; कार्यालयामध्ये मात्र शुकशुकाटच
अकोला शहरातील शिवनी भागातील बहुजन नगरमध्ये मांडूळ या दुर्मीळ जातीचा साप आढळून आला. या संदर्भात सर्पमित्र संदीप पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या मांडूळ जातीच्या सापाला पकडले. सध्या हा साप अकोला वनविभागाकडे स्वाधीन केला असून त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. या मांडूळ जातीच्या सापाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जात धन शोधण्यासाठी कथितपणे मांडूळ सापाचा वापर करतात, अश्या गैरसमजुतींमुळे या बिनविषारी सापाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते.
TAGGED:
मांडूळ साप