अकोला - शहर उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाला एका वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपअधीक्षक यांच्या पथकाने एमआयडीसी भगाात संशयीत कार थांबवली. या कारमध्ये 17 हजार 472 रुपयांची देशी दारू होती. त्यामुळे पोलिसांनी कारसह एकूण 2 लाख 17 हजार 472 रुपयांचा मुद्देमाल शनिवारी सायंकाळी जप्त केला. अतुल जावडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अकोल्यात देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - Akola crime news
अकोला शहर उपअधीक्षक यांच्या पथकाला देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या प्राप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून आरोपीला दारूसाठ्यासह अटक केला आहे.
हेही वाचा -गोंदियात वीज अंगावर कोसळून तरुणीचा मृत्यू, चार गंभीर
अकोला शहर उपअधीक्षक यांचे विशेष पथक हे गस्तीवर होते. पथकाला कार क्रमांक एम.एच. 30 पी 787 या कारमध्ये देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार पकडली. कारमधील 180 मिलीच्या 336 बॉटल्स, किंमत 17 हजार 472 रुपये आणि दोन लाख रुपयांची कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पथकाने अतुल जावडे यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमित डहारे यांच्या पथकाने केली.