महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Schools reopen in Akola : शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट सुरू; पहिल्या दिवशी कमी प्रतिसाद - शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ( Schools reopen in Akola ) आजपासून सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांकडून शाळेत प्रवेश देताना पालकांकडून शाळांनी संमतीपत्र घेतली आहेत. जवळपास सर्वच शाळांमध्ये हा प्रकार झाला आहे.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट

By

Published : Dec 1, 2021, 5:41 PM IST

Updated : Dec 1, 2021, 6:54 PM IST

अकोला - गेल्या पावणेदोन वर्षानंतर कोरोनाच्या महामारीत आज इयत्ता पहिली ते चौथी वर्गाची शाळा ( Schools reopening in Akola during pandemic ) सुरू झाली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ( Akola students response on first day ) तुरळक होता. शाळेत प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क आणि त्यांचे हात सॅनिटाईज करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट आजपासून सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांकडून शाळेत प्रवेश देताना पालकांकडून शाळांनी संमतीपत्र घेतली आहेत. सर्वच शाळांमध्ये जवळपास हा प्रकार झाला आहे.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती क्षमतेपेक्षा कमी

हेही वाचा-Omicron Variant Impact : ओमिक्रॉनचा धोका पाहता औरंगाबाद मनपाच्या हद्दीतील शाळा राहणार बंद

1 डिसेंबरला शाळा सुरू करण्याची राज्य सरकारकडून परवानगी-

विद्यार्थ्यांना सॅनिटायझशेनचे महत्त्व सांगताना शिक्षक

कोरोनाच्या महामारीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय ( gov decision on primary schools opening ) राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी ग्रामीण भागामध्ये पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने इयत्ता पहिली ते चौथी शाळेला परवानगी दिली. आजपासून या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा-MH Primary School Opening : जाणून घ्या, कुठे कधी सुरू होणार शाळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून काळजी-

सोशल डिस्टन्सिंग ठेवत प्रार्थना
शाळेची घंटा सकाळीच वाजली. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे हात सॅनिटाईझ करण्यात आले. तसेच त्यांच्या तोंडावर मास्क आहे किंवा नाही याची खात्री करण्यात आली. जुने शहरातील खंडेलवाल इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या मास्क आणि त्यांचे हात सॅनिटाईझ केल्यानंतर प्रवेश देण्यात आला. त्यासोबतच प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवत रांगेत उभे करण्यात आले. तसेच प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात बसणे संदर्भात कोरोनाचे नियम पाळण्यास संदर्भात माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या हातांचे सॅनिटायझेशन

हेही वाचा-Primary Schools reopen : १ डिसेंबरपासून १ ली ते ४ थीच्या शाळा सुरू होणार; 'अशी' आहे नियमावली

विद्यार्थांमध्ये आनंदाचे वातावरण-

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट सुरू
वर्गात ही विद्यार्थ्यांना एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती क्षमतेपेक्षा कमी होती. विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंद दिसून आला. खूप महिन्यांनी शाळेत आल्यावर शिक्षकांना प्रत्यक्ष भेटणे, सहकारी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
Last Updated : Dec 1, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details