अकोला- हिवरखेड जवळच्या चितलवाडी परिसरातल्या एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्यानंतर कोरड्या विहिरीत पडलेल्या त्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभाग अपयश आले होते. मात्र, वनविभागाने विहिरीत ठेवलेल्या शिडी व झाडाच्या सहाय्याने बिबट्याने शनिवारी रात्री विहिरीतून आपली सुटका करून घेतली आहे.
वन विभागाची दमछाक... शेवटी बिबट्याने स्वत:च करून घेतली विहिरीतून सुटका चितलवाडी येथे 15 मे रोजी रात्री अन्न पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला होता. रात्रीच्या अंधारात कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा बचाव करण्यासाठी 16 मे ला आकोट येथील वन्यजीव संरक्षण विभागाचे एक पथक हजर झाले होते. मात्र, अनेक तास प्रयत्न करूनही त्यांना बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले नव्हते. पुढे त्यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बचाव पथकाला सुद्धा घटनास्थळी पाचारण केले होते.
वन विभागाची दमछाक... शेवटी बिबट्याने स्वत:च करून घेतली विहिरीतून सुटका सुरुवातीला पिंजरा लावून बिबट्याला खाद्य पुरविण्यात आले. परंतु त्यातही यश आले नाही नंतर विहिरीत शिडी ठेवण्यात आली. नंतर झाड ठेवण्यात आले. परंतु, दोन दिवस भेदरलेल्या अवस्थेत असल्यामुळे आणि मनुष्यबळ हजर असल्याची जाणीव असल्याने बिबट्याने बाहेर येण्याचे साहस केले नाही. रात्री उशिरापर्यंत अतोनात प्रयत्न केल्यानंतर दमलेल्या बचाव पथकातील सदस्यांनी बचाव कार्य थांबवले. तसेच तो परिसर निर्मनुष्य केला, जेणे करून बिबट्याची भीती दूर होऊन तो सुटका करून घेईल.
वन विभागाची दमछाक... शेवटी बिबट्याने स्वत:च करून घेतली विहिरीतून सुटका बिबट्याला सुरक्षेची जाणीव झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा अंधाराचा फायदा घेत त्याने शिडी आणि झाडाच्या सहाय्याने वर चढून त्याने आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे (सातपुडा पर्वत मेळघाटकडे) धूम ठोकली. या घटनेने वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.