अकोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज उमेदवारांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सर्वच उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत विजयी होण्याचा विश्वास दर्शवला.
अकोला जिल्हा परिषद : नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख, उमेदवारांची गर्दी - अकोला पंचायत समिती निवडणूक
अकोला जिल्ह्यातील ५३ गण आणि १०६ गट साठी निवडणूक होत आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी केली होती.
जिल्ह्यातील ५३ गण आणि १०६ गट साठी निवडणूक होत आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारखी आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी केली होती.
अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. उमेदवार आणि सूचक अशा दोघांनाच अर्ज भरण्यासाठी आतमध्ये सोडले जात होते. त्यामुळे उमेदवारांसोबत आलेले नागरिक आतमध्ये प्रवेश न मिळाल्याने नाराज झाल्याचेही पाहायला मिळाले.