महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खदान पोलिसांनी पाच आरोपींकडून सात दुचाकी केल्या जप्त - अकोला न्यूज अपडेट

अकोला येथील खदान पोलिसांनी पकडलेल्या पाच जणांकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शुभम मुळे, राहुल देशमुख, अक्षय सातपुते, राजेशसिंग ठाकूर, कृष्णा वाडेकर यांचा समावेश आहे. या सर्वांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे सर्व जण बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.

khadan polish station news
खदान पोलिसांनी जप्त केल्या सात दुचाकी

By

Published : May 9, 2021, 8:16 AM IST

अकोला - दुचाकी चोरी प्रकरणात खदान पोलिसांनी पकडलेल्या पाच जणांकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. हे चारही आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. न्यायालयाने या पाच जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खदान पोलिसांनी सात दुचाकी केल्या जप्त

बसेरा कॉलनीत राहणारे भीमराव डोंगरे आणि रमेश थोटांगे यांच्या दुचाकी चोरी गेल्या. याप्रकरणी त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोन्ही दुचाकी अकोल्यात फिरत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांना पकडून त्यांच्याकडील दुचाकी जप्त केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या साथीदार यांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांना पकडून आणखी पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शुभम मुळे, राहुल देशमुख, अक्षय सातपुते, राजेशसिंग ठाकूर, कृष्णा वाडेकर यांचा समावेश आहे. या सर्वांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे सर्व जण बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडे आणखी चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. ही कारवाई खदान पोलिस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी अजूनही मार्ग आहेत, ते अवलंबले जातील - बाळासाहेब थोरात

ABOUT THE AUTHOR

...view details