अकोला - तक्रारदाराची रजेच्या कालावधीमधील रजा मंजूर करून बिल मंजूर करण्याकरिता 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दोघांना अटक केली आहे. यामध्ये बार्शीटाकळी पंचायत समितीचा प्रभारी गटविकास अधिकारी गोपाल बोंडे आणि बार्शीटाकळी पंचायत समितीचा कनिष्ठ लिपिक अनंत राठोड यांचा समावेश आहे. ही कारवाई तक्रारदारांच्या घरीच करण्यात आली. विशेष म्हणजे, तक्रारदार हे गंभीर आजारी असून ते बिछान्यावर झोपलेले असतानाही त्यांच्याकडून कनिष्ठ लिपिकाने पैसे स्वीकारले.
15 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बीडीओसह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात - अकोला लाचखोरी प्रकरण
तक्रारदाराची रजेच्या कालावधीमधील रजा मंजूर करून बिल मंजूर करण्याकरिता 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दोघांना अटक केली आहे. ही कारवाई तक्रारदारांच्या घरीच करण्यात आली. विशेष म्हणजे, तक्रारदार हे गंभीर आजारी असून ते बिछान्यावर झोपलेले असतानाही त्यांच्याकडून कनिष्ठ लिपिकाने पैसे स्वीकारले.
बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या 50 वर्षीय कर्मचारी पुरुष तक्रारदाराची रजेच्या कालावधीमधील रजा मंजूर करून बिल मंजूर करण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी बीडीओ गोपाल बोंडे व कनिष्ठ लिपिक अनंत राठोड यांनी केली. याबाबत 19 जून रोजी पडताळणी करण्यात आली. प्राजक्ता कन्या शाळा, न्यू खेतान नगरातील तक्रारदार यांच्या घरी कनिष्ठ लिपिक राठोड याने तक्रारदारांकडून 15 हजार रुपये स्वीकारले. तिथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी राठोड यास पैसे घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर राठोड याने दिलेल्या माहितीनुसार बीडीओ बोंडे यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक एस. एस. मेमाणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तक्रारदारकडून घेतलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.