अकोला- पानपट्टीमधील जप्त केलेल्या मालास परत करण्याच्या मोबदल्यात उरलेले दोन हजार रुपये घेणाऱ्या मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील जमादारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. कैलास त्र्यंबक कळमकर, असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
अकोल्यात लाच घेताना जमादार एसीबीच्या जाळ्यात - पानपट्टीवर कारवाई अकोला
मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तक्रारदाराच्या पानपट्टीवर कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी पानपट्टीमधील माल जप्त केला होता. हा माल परत मिळावा, यासाठी तक्रारदाराने कैलास कळमकर याच्याशी संपर्क साधला.
हेही वाचा-पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार
या हवालदाराने पोलीस ठाण्यातच तक्रारदाराकडून पैसे स्विकारले आहेत. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तक्रारदाराच्या पानपट्टीवर कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी पानपट्टीमधील माल जप्त केला होता. हा माल परत मिळावा यासाठी तक्रारदाराने कैलास कळमकर यांच्याशी संपर्क साधला. जमादार कळमकर याने तक्रारदारास पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच तक्रार घेताना त्याच्याकडून आधीच दोन हजार रुपये घेतले. परंतु, त्यानंतर तक्रारदाराला जमादार कळमकर यास पैसे देणे मान्य नसल्याने त्यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार एसीबीने चार सप्टेंबरला पडताळणी केली. त्यानंतर जमादार कळमकर याला उरलेले दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. पोलीस ठाण्यात दबा धरून बसलेल्या एसीबीने तक्रारदाराने जमादारास पैसे देताच रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरोधात मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, एसीबीने केलेली ही कारवाई पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करीत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एस. एस. मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.