अकोला -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्देशानुसार जिल्ह्यात ग्रामीण भागात विलगीकरण व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे. ही व्यवस्था आधीच केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. सुरेश आसोले यांनी दिली आहे.
अकोल्यातील 169 गावामध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगिकरणाची व्यवस्था - कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. त्याठिकाणी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 169 गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या गावांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण असल्याने याठिकाणी विलगिकरणाची व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
'या' ठिकाणी केली जाते व्यवस्था
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिक हे सर्वात जास्त बाधित होत आहे. यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग पाऊल उचलत आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. त्याठिकाणी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 169 गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या गावांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण असल्याने याठिकाणी विलगिकरणाची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, सामाजिक भवन, सभागृह, आरोग्य केंद्र येथे कोरोना रुग्णांचे विलगीकरण तयार करण्यात आले आहे. हे विलगिकरण गृह तयार करण्यासाठी 15व्या वित्त आयोगातून निधी मिळाल्याने सुविधा उभी करण्यास मदत मिळाली आहे, असेही जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-पुण्याला म्युकरमायकोसिसचा विळखा, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद